kapil maknaesakal
मराठवाडा
Latur News : लातूर जिल्ह्यातील चार नगराध्यक्षांना मिळणार पुन्हा संधी
नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा कालावधी अडीच वर्षे ऐवजी पाच वर्षे करण्याचा मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा लातूर जिल्हयातील चार नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना होणार.
चाकूर - नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा कालावधी अडीच वर्षे ऐवजी पाच वर्षे करण्याचा मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा लातूर जिल्हयातील चार नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना होणार असून चाकूर येथे पुन्हा कपील माकणे हे नगराध्यक्ष राहतील.
राज्यातील १०५ नगरपंचायतीच्या निवडणुक २०२१-२२ मध्ये झाल्या होत्या याचा अडीच वर्षाचा कालावधी ८ आॅगस्ट रोजी संपला होता. शासनाकडून पुढील अडीच वर्षासाठीच्या आरक्षण कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे मुदत संपलेल्या जागेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश काढण्यात आला होता.
