लातूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९४.५५ टक्के, कोरोनामुळे आतापर्यंत ६२४ जणांचा मृत्यू

हरि तुगावकर
Sunday, 8 November 2020

लातूर   जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ६२४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रविवारी (ता. आठ) ९३ जणांना कोरोनाची बाधा झाली.

लातूर :  जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ६२४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रविवारी (ता. आठ) ९३ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २० हजार ६९६ वर गेली आहे. यात १९ हजार ५७० जणांनी कोरोनावर मात केली आहे. याचा रिकव्हरी रेट ९४.५५ टक्के इतका झाला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या दोन आकड्यात येत आहे. यात रविवारी ९३ जणांची भर पडली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात २८ कोरोना रुग्णांची वाढ, दोन-तीन दिवसांमध्ये मृत्यूची नोंद नाही

दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी येत असल्याने जिल्ह्यासाठी हे चित्र दिलासादायक आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर वीस हजार ६९६ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी सध्या ५०२ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी २१३ जण हे घरातच उपचार घेत आहेत. आतापर्यंत १९ हजार ५७० जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट ९४.५५ टक्केवर गेला आहे. हा दर जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरत आहे.

शहरात १४१ कन्टेमेंट झोन
यात महापालिकेच्या हद्दीत ॲंटीजेनच्या ३३ व आरटीपीसीआरच्या २९ याप्रमाणे एकूण ६२ कोविड तपासणी करण्यात आले. त्यापैकी ३५ व्‍यक्‍तीचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यंत ७ हजार ८२१ कोरोना बाधित रुग्‍ण संख्‍या झाली आहे. त्‍यापैकी ७ हजार ४८५ रूग्‍ण बरे होऊन घरी गेले आहेत; तसेच मृत रुग्ण १९२ आहेत. यात वय वर्षे ५० च्‍या पुढील रुग्‍णसंख्‍या १५६ इतकी आहे. एकूण मयत रुग्णांपैकी ५१ स्त्री व १४१ पुरुष आहेत. सध्या १४३ अॅक्‍टीव्ह रुग्‍ण संख्‍या आहे. शहरात १४१ कन्टेमेंट झोन कार्यरत आहेत.

लातूर कोरोना मीटर
एकूण बाधित - २०,६९६
उपचार सुरू असलेले - ५०२
बरे झालेले- १९,५७०
मृत्यू- ६२४

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur District's Recovery Rate Above 94 Percent