

Success Story
sakal
जळकोट : मनात काहीतरी करून दाखविण्याची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर यशाचे शिखर गाठणे अवघड नसते, हे येवरी (ता. जळकोट, जि. लातूर) येथील मूळ रहिवासी डॉ. प्रीतमकुमार बाबूराव भाले यांनी सिद्ध करून दाखविले आहे. २०२५ च्या यूपीएससी परीक्षेत त्यांनी अखिल भारतीय स्तरावर ७४२ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सध्या त्यांचे वास्तव्य लातूर येथे आहे.