

Water shortages at police, CRPF and BSF training centres in Latur and Chakur have raised concerns over upcoming training batches.
esakal
लातूर, : दुष्काळाच्या झळा पोलिस, केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) प्रशिक्षण केंद्रांनाही बसू लागल्या आहेत. प्रशिक्षण केंद्रांतील पाणीपुरवठ्याचे स्रोत आटत चालले आहेत. त्यामुळे प्रशिक्षणार्थी अडीच हजार जवान, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या तिन्ही प्रशिक्षण केंद्रांत नवीन वर्षात होणारे प्रशिक्षण टंचाईच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे.