

Labourers work on employment guarantee projects in Latur district amid drought conditions.
esakal
लातूर,: पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम हातचा गेला आहे. रब्बी पेरणीच्या आशाही मावळल्या आहेत. पावसाअभावी शेतजमिनी उजाड पडल्या आहेत. शेतीच्या कामांअभावी शेतमजुरांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत रोजगार हमी योजनेची कामे शेतमजुरांसाठी मोठा आधार ठरत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात रोजगार हमीच्या कामांवर तब्बल ८८ हजार मजुरांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ८८१ कामांवर एक लाख ३४ हजार मजूर काम करीत आहेत. दुष्काळात आलेल्या दिवाळीत मजुरांना याचा आधार मिळत आहे.