Latur Farmers: पैसे नकोत, जमिनीच्या बदल्यात जमीनच द्या; शेतकऱ्यांची अट; लातूर तालुक्यामध्ये हातात आसूड घेऊन आंदोलन
Latur News: शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा संपादन करण्याच्या सरकारच्या निर्णयावर लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यांना तुटपुंजे मोबदला नको असून योग्य मोबदला आणि पर्यायी जमीन दिली जावी, अशी मागणी केली आहे.
लातूर : शक्तिपीठ महामार्ग करण्याचा हट्ट सरकारने धरला आहे. तो पूर्ण करण्यासाठी सरकारला आमची शेतजमीन हवीच आहे तर घ्या. पण, जमिनीच्या मोबदल्यात आम्हाला तुटपुंजे पैसे नकोत.