esakal | कौतुकास्पद! लातुरची चिमुकली घेतेय दक्षिण आफ्रिकेतून शिक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

pradnya

कौतुकास्पद! लातुरची चिमुकली घेतेय दक्षिण आफ्रिकेतून शिक्षण

sakal_logo
By
केतन ढवन

उजनी (लातूर): येथील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत असलेल्या महात्मा गांधी इंग्लिश स्कूल मधील तीसरीतील विद्यार्थीनी कोरोना संकटात शाळा बंद असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेतून ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे घेत आहे. दरम्यान ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थी व पालकांनी पाठ फिरवलेली असताना या विद्यार्थीनीने आणि तिच्या पालकांनी शिक्षणासाठी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद ठरत आहे.

उजनी (ता. औसा) येथील जाजू परिवाराचे जावई गौरव लोया यांची मुलगी उन्नती लोया ही येथील महात्मा गांधी इंग्लिश स्कूल मध्ये प्री प्रायमरी वर्गापासून शिक्षण घेत आहे. लोया हे नोकरीसाठी दक्षिण आफ्रिकेतील कांगो देशात वास्तव्यास आहेत. त्यामूळे उन्नती शिक्षणासाठी तिच्या आईसोबत येथे आजोळी राहत असते. ती दुसरीत असताना कोरोना संसर्गामुळे शाळा बंद होण्याच्या अगोदर ती तिच्या आईसोबत वडिलांकडे दक्षिण आफ्रिकेत गेली होती.

हेही वाचा: PHOTOS: मेस्सी, छेत्री की रोनाल्डो? पाहा सर्वाधिक गोलस्कोरर

त्यानंतर लागलीच मार्च २०२० पासून भारतात टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्यामूळे तिला भारतात पुन्हा परत येता आले नाही. परिणामी ती तेंव्हापासून परदेशातूनच शाळा घेत असलेल्या ऑनलाईन वर्गासाठी उपस्थित राहून शिक्षणाचे धडे घेत आहे. विशेष बाब म्हणजे इकडे दिवस असताना तिकडे रात्र असून देखील ती वेळेवर व नियमित ऑनलाईन वर्गास हजर राहत असल्याची माहिती तिच्या शिक्षकांनी दिली.

दरम्यान मागील दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरु आहे. ग्रामीण भागात बहुतांश विद्यार्थी व पालकांचा ऑनलाईन शिक्षणासाठी अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अद्याप ही शाळा सुरु करण्याबाबत शासनस्तरावरून कोणतेही आदेश नाहीत. त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने या वर्षीही शाळा सुरू होण्यासंदर्भात शंका व्यक्त केली जात आहे. त्यामूळे विद्यार्थ्यांचे कधीही भरून न निघणारे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थी व पालक शाळा सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा: PHOTO: मराठवाड्यातील 'या' प्रसिद्ध पर्यटनस्थळांना एकदा तरी भेट दिलीच पाहिजे

उन्नती ही आमच्या शाळेतील हुशार व मेहनती विद्यार्थीनी आहे. शाळा बंद असल्याने 'शाळा बंद, शिक्षण सुरु ' या शासन आदेशाप्रमाणे शाळेचे ऑनलाईन वर्ग नियमित सुरु आहेत. त्यासाठी उन्नती ही दक्षिण आफ्रिकेतून या वर्गास नियमित उपस्थीत राहते व दिलेले गृहकार्य देखील वेळेत पूर्ण करते.

- आशाराणी ओझा, मुख्याध्यापिका, महात्मा गांधी इंग्लिश स्कूल, उजनी

loading image