Latur : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान द्या; बनसोडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

latur news

Latur : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान द्या; संजय बनसोडे

जळकोट : यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टी, सततचा पाऊस, कीडरोग प्रादुर्भावाला सामोरे जावे लागले. परिणामी शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेलेला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना तसतशी मदत मिळावी अशी मागणी केली होती. शासनाकडून जळकोट तालुक्यासाठी सतरा कोटी ३५ लाख रुपये मंजूर झाले असून सदरिल रक्कम ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्यात यावी, असे आदेश माजी गृहराज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.

हेही वाचा: Latur : हासोरी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

नैसर्गिक संकटामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला होता परिणामी शेतकरी मोठ्या अडचणीत आला होता. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीची गरज होते. आमदार संजय बनसोडे इतर जणांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून या पाठपुराव्याच्या माध्यमातून सरकारने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.पहिल्या टप्पात अतिवृष्टीची रक्कम मिळणार आहेत तर दुसप्या टप्पात गोगलगायची रक्कम मिळणार आहे.

हेही वाचा: Latur : लातूर जिल्ह्यात भाजपचे 'धन्‍यवाद मोदीजी' अभियान

सदरील अतिवृष्टीची रक्कम आणण्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना स्वतः भेटून अतिवृष्टीत किती नुकसान झाले यांची माहिती दिली होती. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यावर शेतकऱ्यांची अवस्था पाहू शकत नव्हतो. बळीराजाला दिपावळी सण साजरा होणार नाही अशी भिती व्यक्त होत होती.पंरतू आपण शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहून शासनाकडून अतिवृष्टीची नुकसान भरपाई खेचून आणली असल्याने बळीराजाची दिवाळी आनंदात साजरी होण्यास मदत मिळणार आहे. यापुढे बळीराजाचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावरही उतरावे लागले तरीही उतरणार असल्याचे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले.