esakal | लातूर: अहमदपूरात पावसाची जोरदार हजेरी; अहमदपूर-लातूर कारेपुर मार्गे रस्ता बंद
sakal

बोलून बातमी शोधा

latur

लातूर: अहमदपूरात पावसाची जोरदार हजेरी

sakal_logo
By
प्रा. रत्नाकर नळेगांवकर

अहमदपूर : तालुक्यात सर्वदूर मंगळवारी ( ता.7) सकाळपासून जोरदार पाऊस होत असून, खानापूर जवळील पुलावरून पाणी वाहत आहे. तालुक्यात मागील चार दिवसांपासून सर्वदूर पाऊस सुरू आहे. मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने खंडाळी, अंधोरी, किनगाव, उजना, रोकडा सावरगाव, परचंडा, धानोरा, कोपरा, दगडवाडी, मोहगाव, खनापूर, गुंजोटी, सोनवणेवाडी, कोळवाडी, हंगेवाडी परीसरातील नदीनाले एक झाले आहेत. खानापूर येथील काही घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: गौताळा घाटात नागद-कन्नड मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

किनगाव-लातूर मार्गावर खानापूर येथील मन्याड नदीच्या पुलावरून मंगळवारी सकाळपासून पाणी जात असल्याने लोकांसह वाहनांना या रस्त्यावरून जाताना अडचण होत होती. पावसाचा जोर वाढल्याने पाण्याचा प्रवाह वाढत आहे. सध्या या रस्त्यावरील वाहतूक थांबली आहे. अहमदपूर-लातूर मार्गे कारेपूर ही बस सेवा पुलावरून पाणी जात असल्याने बंद करण्यात आली.

तालुक्यात मागील चार दिवसापासून होत असलेल्या सततच्या पावसाने शेत शिवारात पाणी साचले आहे. ऊस, सोयाबीन, मुग या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, हा पाऊस शेतकऱ्यांसाठी आर्थिक नुकसानीचा ठरत आहे.

loading image
go to top