Killari Earthquake 1993 : मृतदेहांनी खचाखच भरलेले गाव, फक्त दगड मातीचे डोंगर..  किल्लारी भूकंपाचा मन सुन्न करणारा अनुभव

Killari Earthquake 1993 : मृतदेहांनी खचाखच भरलेले गाव, फक्त दगड मातीचे डोंगर.. किल्लारी भूकंपाचा मन सुन्न करणारा अनुभव

गावात एकही उंबरठा दिसत नव्हता, फक्त दगड मातीचे डोंगर दिसत होते.
Published on

इस्माईल शेख

मी फोटोग्राफी, व्हीडीओ शुटींगच्या व्यवसायानिमित्त उमरग्यात वास्तव्यास होतो. तेव्हा मी २६ वर्षांचा होतो. भूकंप झाल्यानंतर स्वतःच्या ट्रकमध्ये काही स्वयंसेवकांना घेऊन सकाळी साडेसहाला भूकंपाचा केंद्रबिंदू असलेले एकोंडी (लोहारा) गाव गाठले. गावात एकही उंबरठा दिसत नव्हता, फक्त दगड मातीचे डोंगर दिसत होते.

आमची टीम पहिल्यांदा या गावात गेल्याने, ‘साहेब, वाचवा हो.. आमचे एवढे लोक अडकले आहेत,’ अशी एकच आर्त हा ऐकायला येत होती. ज्यांना काढणे शक्य आहे, अशा  ३० ते ३२ लोकांना आम्ही ढिगाऱ्यांबाहेर काढले. तेथून मी स्वतः दुचाकीवरून किल्लारी गाठले, तेथील मुख्य चौकात बघ्यांची गर्दी होती, मधली बाजू मृतदेहांनी खचाखच भरली होती. हे चित्र पाहून शूटींगसाठीचा माझा हात थरथर कापत होता.

Killari Earthquake 1993 : मृतदेहांनी खचाखच भरलेले गाव, फक्त दगड मातीचे डोंगर..  किल्लारी भूकंपाचा मन सुन्न करणारा अनुभव
Killari Earthquake 1993 : स्वप्नकंपाची तीस दशके ! दहा हजार कुटुंबांचे स्थलांतर झाल्याची भीती

वाहनांतून मृतदेह पाठवली जात होती. सकाळी अकराच्या सुमारास सास्तूरला बचावकार्य सुरु होते. शांतेश्वर विद्यालयाच्या पटांगणातील मृतदेहांची भलीमोठी रांग पाहून मन सुन्न झाले होते.

तब्बल २४ दिवस भूकंपग्रस्त भागात फिरलो. या काळात जात-पात, धर्म, पक्ष, सरकार, मी मोठा, तो मोठा असा एकही शब्द ऐकायला मिळाला नाही. नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी स्वयंसेवक, प्रशासन आणि नागरिकांनी एकजूट दाखवली. कालांतराने पुनर्वसनाचे काम झाले, घरे मिळाली. पण गावपण हरवले, याचीही खंत वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com