वडील रागावले म्हणून अल्पवयीन मुलांनी गाठलं थेट पुणे! उदगीरातील बेपत्ता मुले अखेर सापडली

udgir
udgir

उदगीर(लातूर): उदगीरहुन पळालेली तीन अल्पवयीन मुले अखेर पुण्यात सापडली आहेत. या मुलांना ताब्यात घेण्यासाठी शहर पोलिसांचे पथक पुण्याला रवाना झाले आहे.
याबाबत शहर पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शहरातील नगरपालिके समोरील फुटपाथवर पाल मारून राहणाऱ्या घिसाडी समाजाची तीन अल्पवयीन मुले गुरुवारी (ता.२५) दुपार पासून गायब झाली होती.

ही अल्पवयीन मुले घराकडे येत नसल्याने त्यांचा पालकांनी शोध घेतला. रात्रीपर्यंत शोध घेऊनही ही मुले सापडत नसल्याने अखेर या मुलाच्या पालकांनी शहर पोलीस ठाणे गाठून ठाण्यात तक्रार दाखल केली. अंकुश व्‍यंकटराव चव्‍हाण यांच्या फिर्यादीवरून सुनील अंकुश चव्हाण (वय-१२), सचिन विक्रम चव्हाण (वय-१३), दर्शन लक्ष्मण डांगे (वय-१५) यांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घरात वडीलांनी रागावल्याचे कारण मनात भरून तीन मुले शिर्डीला जाण्यासाठी निघाले. यापैकी एका मुलांने घरातील साडेतीन हजार रुपये सोबत घेतले होते. शिर्डीला जाण्यासाठी उदगीर रेल्वे स्थानकावर ही मुले दाखल झाली. शिर्डी ऐवजी पुणे रेल्वे स्थानकात आली. ही मुले या गाडीत बसली व थेट पुण्याला गेली. तेथे या मुलांकडे कोठे जायचे आहे? काय करायचे? याचे नियोजन नसल्यामुळे गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे तेथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी यां मुलाची चौकशी  केली असता उदगीरचे असल्याचा संदर्भ दिला. त्यावरून ही माहिती संबंधित पोलिसांनी लातूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास दिली.

उदगीर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेली तक्रार व फोटोला अनुसरून ही मुले उदगीरचीच असल्याचे निष्पन्न झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड हे या मुलांना ताब्यात घेण्यासाठी पुण्याला रवाना झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक श्री अंदोरीकर यांच्यासह संजय दळवे, डीबी शाखेचे राजकुमार घोरपडे, योगेश फुले, गजानन पुल्लेवाड, मच्छिंद्रनाथ वरटी, मारोती जायभाये यांनी या मोहिमेसाठी पुढाकार घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com