esakal | Corona Updates: लातुरात २४ तासांत रुग्णांचा उच्चांक; आतापर्यंत ७८० जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona condition in Latur

लातूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालला असून रविवारी (ता. चार) तर रुग्णसंख्येने उच्चांक गाठला

Corona Updates: लातुरात २४ तासांत रुग्णांचा उच्चांक; आतापर्यंत ७८० जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लातूर: लातूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालला असून रविवारी (ता. चार) तर रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. ८०४ रुग्ण आढळले. आतापर्यंतच्या तुलनेत दिवसभरातील हा सर्वांत मोठा आकडा आहे. दरम्यान उपचार सुरु असताना पाच जणांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात एक हजार ५२५ आरटीपीसीआर चाचण्यांतून ४०५ तर एक हजार २७१ ॲन्टीजेन चाचण्यांतून ३९९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. रुग्णसंख्या ३६ हजार ३३२ वर पोचली असून २९ हजार ५७३ रुग्ण बरे झाले आहेत. ५ हजार ९७९ जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ७८० जणांचा मृत्यू झाला आहे. 

किरीट सोमय्या म्हणतात, आघाडी सरकारचे अर्धा डझन मंत्री घरी जाणार

शहरातील कोरोना बाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी. खासगी केंद्रामधून सीटीस्कॅन, अँटीजेन चाचणी शासन मान्य दरानेच केल्या जाव्यात. याकरिता महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशा सूचना महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सोमवारी (ता. पाच) येथे दिल्या.

शहरातील वाढत्या कोरोना बाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोरोना कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल, उपायुक्त मयूरा शिंदेकर उपस्थित होत्या. अनेक रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता भासत आहे. परंतु, रुग्णांना इंजेक्शन सहजतेने उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्याकरिता जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधत इंजेक्शनचा अनधिकृत साठा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या तसेच खासगी मान्यताप्राप्त रुग्णालयांना दैनंदिन लागणाऱ्या इंजेक्शनचे ऑडिट करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

चक्क तलवारीने खाऊ घातला केक! बहाद्दरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पालकमंत्री अमित देशमुख यांनी देखील शहरास रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासणार नाही याकरिता शासन स्तरावरून सूचना दिलेल्या आहेत. शहरात अनेक खासगी चाचणी केंद्रात सीटीस्कॅन, अँटीजेन चाचणी केली जात आहे. शासनमान्य दरानेच या चाचण्या झाल्या पाहिजेत. प्रत्येक केंद्रात शासनमान्य दर दर्शविणारा फलक लावला जाईल याची खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. 
 

loading image