कोरोनामुळे तब्बल अकरा महिन्यानंतर फुलली महाविद्यालये ....!

विवेक पोतदार
Thursday, 18 February 2021

विद्यार्थ्यांचा वाढला उत्साह वाढल्याचे दिसत होते. तसेच काॅलेज कट्ट्यावर गप्पाही रंगल्याचे दिसले होते.

जळकोट (जि.लातूर): कोरोना संकटामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून बंद असलेली महाविद्यालये सुरु करण्याच्या शासन निर्देशानुसार शहरातील महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा उत्साह असून काॅलेज कट्ट्यावर गप्पा रंगत त्यांच्या उपस्थितीमुळे परिसर फुलत असल्याचे चित्र आहे.

शहरातील संभाजीराव केंद्रे वरिष्ठ महाविद्यालय, मानवेंद्र केंद्रे अध्यापक महाविद्यालय, महात्मा फुले महाविघालय, उज्वल ग्रामिण महाविद्यालय घोणसी, महात्मा फुले अध्यापक महाविद्यालय, अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. वर्गात शिकविणाऱ्या प्राध्यापकांचा आवाज घुमू लागला आहे. महाविद्यालयांच्या ग्रंथालय व प्रयोगशाळा आणि  क्रिडांगण परिसर विद्यार्थ्यांमुळे बहरू लागल्याचे चित्र आहे. कॉलेज कट्ट्यांवर गप्पागोष्टी सुरू झाल्या आहेत. पण, हे सर्व करताना सॅनिटायझर, मास्क आणि शारिरीक आंतराचे पालन  या नियमांचे पालन करण्याच्या सूचना आहेत.

हिंगोली जिल्ह्यात कोरोना पाय पसरतोय, रुग्णसंख्येत होतेय वाढ

राज्य सरकारने १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याच्या आदेशानुसार शहर व परिसरातील महाविद्यालये सुरू झाली. थेट वर्ग व प्रॅक्टिकलचे नियोजन महाविद्यालयांनी केले आहे. राज्य सरकारने उपस्थितीसाठी ५० टक्क्यांची अट टाकलेली आहे. त्यामुळे काही महाविद्यालयांनी  पदवीचे, प्रथम व्दितीय, तृतीय वर्ष पदवीच्या वर्षातील विद्यार्थ्यांचे वर्ग भरवले. 

सात हजारांची लाच प्रकरणी ग्रामसेवकाला तीन वर्षांची शिक्षा, लातूर न्यायालयाचा...

महाविद्यालयात नियमांचे पालन व्हावे यासाठी खास कर्मचारी महाविद्यालयांनी नियुक्त केले आहेत. मास्कचा वापर अनिवार्य आहे. महाविद्यालय आवारात विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करावे यासाठी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सूचना दिल्या जात आहेत.
नांदेड विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या संभाव्य परीक्षा मार्च एप्रिल महिन्यात   होणार असून परीक्षा संदर्भातील कामकाज प्रात्याक्षिके रेकॉर्ड बुक, शिष्यवर्ती फॉम भरण्यासाठी  विद्यार्थी महाविद्यालयात येत आहेत. कार्यालयाबाहेर क्रिडांगण , बॉटनिकल गार्डन , मैदानात तसेच ग्रंथालयात काहीसे गजबजल्या सारखे चित्रही महाविद्यालयात परिसरात दिसत आहे.

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालये १५ फेब्रवारीपासून सुरू झाले आहेत. आमच्या महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या निर्देशानुसार ५०% प्रमाणे अंदाजे २५० ते २७५ विद्यार्थी हजर होताहेत. एकीकडे अभ्यासक्रम मर्यादित कालावधीत संपवण्याची घिसाडघाई आणि दुसरीकडे पुन्हा कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव अशा दोलायमान स्थितीत अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि त्यांचे आरोग्य या दोन्ही बाबी विचारात घेऊन पुढे गेले पाहिजे. कोव्हिड पार्श्वभूमीवर दक्षता घेतली जात असून प्राध्यापक व विद्यार्थ्यासह कर्मचार्यांना तशा सूचना दिल्या आहेत- डॉ. बी. टी. लहाने (प्राचार्य, संभाजीराव केंद्रे महाविद्यालय,जळकोट)
 

(edited by- pramod sarawale) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur latest news school started after 11 months due to corona