esakal | चाकूर तालूक्यात कोरोना लसीचा तुटवडा, लसीकरणाला बसणार ब्रेक
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

चाकूर तालूक्यात कोरोना लसीचा तुटवडा, लसीकरणाला बसणार ब्रेक

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

चाकूर (लातूर): कोरोनावर अटकाव आणण्यासाठी लसीकरणाला प्राधान्य दिले जात असताना तालूक्यात फक्त अकरा हजार व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे. गुरूवारी (ता.१५) दुपारी तालूक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील लसीचा साठा संपला असल्यामुळे लसीकरणाला ब्रेक बसणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली असल्यामुळे यावर उपाय म्हणून कोरोना लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. लस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची बाधा होत असली तरी तीव्रता कमी होत असल्यामुळे लसीकरणाला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या तुलनेत शहरातून लसीकरणासाठी उदासीनता आहे. आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लसीकरण सुरु करण्यात आले असून त्याचे पथक गावोगावी जाऊन लसीकरण करून घेत आहेत.

सध्या तालूक्यातील चापोली प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत २१५८, जानवळ २६९५, नळेगाव २३५२ जणांना लस देण्यात आली आहे. चाकूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात ४२३० जणांना लस देण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रातील जवानांनाही या ठिकाणी लस दिली जात असल्यामुळे बुधवार पर्यंत ११४३५ जणांना लस देण्यात आली आहे. तालूक्यातील एकूण लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण कमी आहे. लसीकरण वाढविण्याची आवश्यकता असताना जिल्हास्तरावरून लसीचा पुरवठा झाला नसल्यामुळे गुरूवारी दुपार पासून सर्व केंद्रावरील लसीचा साठा संपला आहे.

लसीकरण वाढवले जाणार असल्याची माहिती वैदयकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर येथे केल्यानंतर काही तासांत अचानकपणे लसीचा पुरवठा बंद झाला आहे. ग्रामीण रुग्णालयात ८० लस शिल्लक आहेत तर चापोली, जानवळ, नळेगाव येथील साठा संपलेला आहे. लसीसाठी जिल्हास्तरावर मागणी करण्यात आली आहे परंतू पुरवठा झाला नसल्यामुळे शुक्रवार पासून लसीकरणाला ब्रेक बसण्याची शक्यता असून तातडीने लसीचा पुरवठा करण्याची मागणी केली जात आहे.