तलावात पोहणे पडले महागात, चाकूरजवळ दोन मेंढपाळांचा पाण्यात बुडून मृत्यू

प्रशांत शेटे  
Sunday, 24 January 2021

तलावाच्या शेजारील शेतात मेंढपाळांची टोळी बसलेली असून यात दोन मुले रविवारी दुपारी पोहण्यासाठी तलावाकडे गेले होते.

चाकुर (जि.लातूर) : शहराजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मेंढपाळांचा पाण्यात बडून मृत्यु झाल्याची घटना रविवारी (ता.२४) दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. शहराच्या जवळ वस्तीवाढ भागात एक तलाव आहे. या तलावातील पाण्यात बुडून दरवर्षी मृत्यु होतात. तलावाच्या शेजारील शेतात मेंढपाळांची टोळी बसलेली असून यात दोन मुले रविवारी दुपारी पोहण्यासाठी तलावाकडे गेले होते.

OBC March: जालन्यात ओबीसींचा विराट मोर्चा; जानकर, बावनकुळेंसह महिलांचा लक्षणीय सहभाग

बऱ्याच वेळ झाल्यानंतर ही मुले शेताकडे वापस आले नाही. त्यामुळे शोधण्यासाठी गेले असता तलावाच्या कडेला मुलांची कपडे आढळून आली. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस अंमलदार रामचंद्र गुंडरे, पाराजी पुठ्ठेवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. रिपाईचे तालुकाध्यक्ष पपन कांबळे यांनी तलावात जाऊन शोध घेतला असता दोन्ही मृतदेह त्यांच्या हाती लागले. वैभव राजकुमार मसुरे (वय १३, रा.हाळी, ता.उदगीर), कृष्णा गोविंद कमलापुरे (वय १६, रा. मुरंबी, ता.लोहा) अशी मृत मुलांची नावे असून या प्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Edited - Ganesh Pitekar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Latest News Two Sheppards Drowned Near Chakur