esakal | 'अन्यथा कोरोना रुग्णाला उपजिल्हाधिकारी कार्यालयात आणून ठेवणार...'

बोलून बातमी शोधा

corona

तालुक्यात कोरोना संसर्ग वेगाने वाढत असून वैद्यकिय सुविधा अपुर्‍या पडत आहेत

'अन्यथा कोरोना रुग्णाला उपजिल्हाधिकारी कार्यालयात आणून ठेवणार...'
sakal_logo
By
सचिन शिवशेट्टे

उदगीर (लातूर): तालुक्यात कोरोना संसर्ग वेगाने वाढत असून वैद्यकिय सुविधा अपुर्‍या पडत आहेत. दररोज  दोनशे ते अडीचशे रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. या रुग्णांना सरकारी रुग्णालयात बेडची कमतरता जाणवत आहे. शासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. आगामी काळात भयंकर कोरोनाचे संकट वाढणार आहे. यावर प्रशासन गंभीर दिसत नाही. लवकर कोरोना रुग्णांची सोय करा अन्यथा रुग्णाला उपजिल्हाधिकारी कार्यालयात आणून ठेवणार असल्याचा इशारा भाजपाचे शहरअध्यक्ष उदयसिंह ठाकुर यांनी दिला आहे.

कोरोना संकटात काही खासगी हॉस्पिटल्सना रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु या खासगी हॉस्पिटलमध्येही ऑक्सीजन, बेड आणि व्हेंटिलेटरची संख्या अपुरी पडत असून रेमेडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे.  ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत अशा सर्व रुग्णांसाठी शहराबाहेरील मंगल कार्यालय, लॉज, शाळा व महाविद्यालये अधिग्रहीत करून या ठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध करून द्यावे.

विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घेतली कोरोना लस

ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता पाहूनच सरकारी रुग्णालयात प्राधान्याने उपचार देण्यात यावे. अशी मागणी करुनही प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे. जर कोरोनाच्या रुग्णाची अशीच गैरसोय होणार असेल तर तीव्र आंदोलन छेडावे लागेल. असा इशारा प्रसिद्धीपञकाद्वारे दिला आहे.