Latur Newssakal
मराठवाडा
Latur News: ड्रग्ज घेणारे तिशीतील तीन तरुण ताब्यात; तिघांवर कारवाई, अधिक तपासासाठी पोलिसांची दोन पथके रवाना
Latur Drugs Case: लातूर शहरातील तीन तरुण एमडी ड्रग्ज सेवनप्रकरणी पोलिसांच्या तावडीत आले आहेत. हे तरुण स्वतःसाठी आणि मित्रांसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
लातूर : लातूर ड्रग्ज प्रकरणातील एमडी ड्रग्जचे सेवन करणाऱ्या शहरातील तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील दोन तरुण तिशीतील आहेत. तर, एका तरुणाचे वय अवघे २१ आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली ही मुले स्वत:साठी आणि स्वत:च्या मित्रांसाठी ड्रग्जची खरेदी करीत असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली. दरम्यान, लातुरात ड्रग्जचा पुरवठा कोणत्या शहरातून होत आहे, याचा तपास सध्या पोलिसांकडून घेतला जात आहे.