Latur Gas Shortage: लातूरच्या मेसमध्ये गॅस तुटवडा; चुली व कोळशावर स्वयंपाक सुरू; लाकड व चुलीचे दर दुपटीने वाढले, मेसच्या महिन्याचे दरही वाढले

Gas Shortage Hits Latur Messes: लातूर शहरातील मेसमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या तुटवड्यामुळे चुली व कोळशावर स्वयंपाक सुरू झाला आहे. लाकड व चुलीचे दर दुपटीने वाढले असून, मेसचे दरही ५०० रुपयांनी वाढवावे लागत आहेत. विद्यार्थी जेवणासाठी अधिक खर्च करीत आहेत, मेसचालकांची कसरत सुरू आहे.
Latur Gas Shortage

Latur Gas Shortage

esakal

Updated on

लातूर: व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद असल्याने शहरातील हॉटेल चालकांपाठोपाठ आता ‘मेस’चालकांचीही चांगलीच कसरत सुरू झाली आहे. मेसमधील गॅसच्या शेगड्या बाजूला काढून त्या जागेत चुली आणि कोळशाची शेगडी ठेऊन स्वयंपाक करण्यावर भर दिला जात आहे. शहरातील बहुतांश ठिकाणी हेच चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, एका मेसमध्ये स्वयंपाकासाठी दिवसाला जवळपास एक हजार रुपयांचे सरपण वापरले जाते. मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने सरपणाचे दरही वाढले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com