दुष्काळी लातुरात सलग दुसऱ्या दिवशी लाखो लिटर पाणी वाया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

यशोदा चित्रपटगृहाजवळील रस्त्यानंतर आता शिवाजी चौकातील महापालिकेची जलवाहिनी फुटली. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे दिसून आले. पण जलवाहिन्या वारंवार फुटत आहेत, अशा तक्रारी करूनही महापालिकेचे अधिकारी दुरूस्तीसाठी रस्त्यावर उतरताना दिसत नाहीत. त्यामुळे पाणी बचतीबाबत अधिकाऱ्यांच्याच मनात अनास्था आहे, हे स्पष्ट होत आहे.

लातूर : यशोदा चित्रपटगृहाजवळील रस्त्यानंतर आता शिवाजी चौकातील महापालिकेची जलवाहिनी फुटली. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे दिसून आले. पण जलवाहिन्या वारंवार फुटत आहेत, अशा तक्रारी करूनही महापालिकेचे अधिकारी दुरूस्तीसाठी रस्त्यावर उतरताना दिसत नाहीत. त्यामुळे पाणी बचतीबाबत अधिकाऱ्यांच्याच मनात अनास्था आहे, हे स्पष्ट होत आहे. 

लातूरात गेल्या दहा महिन्यांपासून दुष्काळाची स्थिती आहे. पुरेसा पाऊस नसल्याने दुष्काळाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. अशा स्थितीत उपलब्ध पाण्याची बचत करणे गरजेचे आहे. पण पालिकेच्या जलवाहिन्या वेगवेगळ्या कारणांमुळे वारंवार फुटत आहेत. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. 

यशोदा चित्रपटगृहाच्याजवळ महापालिकेची जलवाहिनी रविवारी (ता. 22) फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. तब्बल एक तास पाण्याचे मोठे फवारे या भागात पहायला मिळाले. रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत होते. त्यानंतर काही वेळाने या भागातील पाणी पुरवठा बंद करण्यात आला. असाच प्रकार वर्दळीचा भाग असलेल्या शिवाजी चौकात सोमवारी (ता. 23) घडला.

बस डेपोसमोरील रस्त्यावरील जलवाहिनी दोन ठिकाणी फुटल्यामुळे सकाळपासून या भागातील रस्ते जलमय झाले होते. या भागात वारंवार जलवाहिनी फुटते. पण काही दिवसांनी पालिकेचे कर्मचारी ताप्तुरती मलमपट्टी करतात. त्यामुळे पून्हा जलवाहिनी फुटून पाणी वाया जाण्याचे प्रकार घडतात, अशा तक्रारी येथील नागरिकांनी सकाळकडे केल्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Latur, millions of liters of water were wasted