Latur News : कर वसुलीसाठी लातूर महापालिकेने एका बँकेचे एटीएम व एक नर्सरी केली सील

कर भरणा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आतापर्यंत मालमत्ता धारकांना सूचना देण्यात आल्या.
latur
laturesakal

लातूर : शहरातील मालमत्ता धारकांकडे थकीत असणारा कर वसूल करण्यासाठी वारंवार नोटिसा देऊनही कर भरणा केला जात नसल्याने महापालिकेने आता जप्ती मोहिम सुरु केली आहे. यात मंगळवारी (ता.१६) महापालिकेने एका बँकेचे एटीएम व एक नर्सरी सील केली. नागरिकांनी जप्ती टाळण्यासाठी कर भरणा करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

कर भरणा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आतापर्यंत मालमत्ता धारकांना सूचना देण्यात आल्या. अनेक नोटीसाही पाठवण्यात आल्या. तरीही कराचा भरणा केला जात नसल्याने महापालिकेने ही मोहिम हाती घेतली आहे.

या अंतर्गत मंगळवारी (ता. १६) काही मालमत्तांची जप्ती केली. क्षेत्रीय कार्यालय अ अंतर्गत बार्शी रस्त्यावरील एव्हरग्रीन नर्सरी या मालमत्ता धारकाकडे एकूण २ लाख ८१ हजार ५३० रुपये कराची थकबाकी होती. हा कर न भरल्यामुळे आयुक्तांच्या आदेशावरुन नर्सरी सील करण्यात आली. एका मालमत्ताधारकाने २ लाख ९७ हजार ४० रुपयांचा कर थकवाल्यामुळे त्यांच्या मालमत्तेत असणारे बँकेचे एटीएम व दुकान सील केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com