

Latur Corporation Issue
esakal
लातूर : नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर गेल्या दीड महिन्यात नागरिकांच्या वेगवेगळ्या कामांसाठी मी अनेकदा महापालिकेत आले. कामे मार्गी लावता आली; पण महापालिकेच्या वास्तूत आल्यानंतर मला कुठेही महिलांचे स्वच्छतागृह दिसले नाही. त्यामुळे माझ्यावर काय परिस्थिती ओढवली हे मीच जाणते... अशा शब्दांत आपला धक्कादायक अनुभव ‘सकाळ’ला सांगत होत्या एक नवनिर्वाचित युवा नगरसेविका. यानिमित्ताने नागरिकांना सोई-सुविधा पुरवण्याचा निर्णय घेणाऱ्या महापालिकेतच नगरसेविकांची आणि अडचणी घेऊन येणाऱ्या अन्य महिलांची अवस्था समोर आली.