aishwarya chikte and nandini jhanwar
sakal
लातूर - लातूरमधील दोन उच्चशिक्षित विद्यार्थिनी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. यातील एका विद्यार्थिनीने लंडनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तर दुसरी लातूरमध्ये विधी महाविद्यालयात सध्या शिक्षण घेत आहे. उच्चशिक्षित विद्यार्थिनी निवडणूक लढवत असल्याने त्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. ऐश्वर्या चिकटे आणि नंदिनी झंवर अशी त्यांची नावे आहेत.