vikrant gojamgunde and deepak sul
sakal
लातूर - महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष वेधणाऱ्या लढतीत दोन माजी महापौरांना मात्र पराभव स्वीकारावा लागला. तर दोन माजी महापौर मात्र महापालिकेत दिसणार आहेत.
या निवडणुकीत चार माजी महापौर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यात महापालिकेच्या पहिल्या महिला महापौर प्रा. स्मिता खानापुरे यांना काँग्रेसने प्रभाग पंधरामधून उमेदवारी दिली होती. त्यात भाजपसाठी हा प्रभाग सेफ झोनमध्ये होता. त्यामुळे पक्षाच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. या प्रभागात होनराव यांच्याबद्दल नाराजी आहे, असे चित्र उभारण्यात आले होते.