latur municipal election result congress party winner celebration
sakal
लातूर - महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ‘काय म्हणतयं लातूर, कमळ...कमळ...कमळ...’ अशी टॅगलाइन वापरून प्रचार केला होता. त्याला निकालानंतर लातूर म्हणतंय काँग्रेस...काँग्रेस...काँग्रेस... असे उत्तर मिळाले असून, लातूरकरांनी भाजपला दिलेली ही चपराक आहे. भाजपला धोबीपछाड करीत काँग्रेसने महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवले असून, राज्यभरात भाजपचे वादळ असताना येथे मात्र, सत्तेपासून फार दूर राहावे लागले आहे. ही बाब पक्षनेत्यांसाठी चिंतेची आहे.