
Latur Crime
sakal
मुरुड, (जि.लातूर) : चाटा (ता. लातूर) येथे दोन शेतकऱ्यांमध्ये बांध बुजविण्याच्या व ट्रॅक्टर घेऊन जाण्याच्या कारणावरून मारहाण झाली. यात दोन्हींकडील चार जण जखमी झाले असून, दिलेल्या फिर्यादीवरून परस्परांविरोधात मुरुड पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.