

Midnight Robbery on Latur-Nanded Highway
sakal
चाकूर : लातूर ते नांदेड महामार्गावरील चापोली (ता.चाकूर) येथील उड्डाणपुलावर कारमध्ये थांबलेल्या प्रवाशांना चार दरोडेखोरांनी लोखंडी राॅडने मारहाण करीत त्यांच्याकडील रोख रक्कम, सोन्याचे दागीने व मोबाईल काढून घेतल्याची घटना बुधवारी (ता.१७) पहाटे अडीच वाजता घडली आहे. महामार्गावर लुटमारीची घटना घडल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.