अहमदपूर तालुक्याने ग्रामपंचायतीत साधली हॅटट्रिक

उदयकुमार जोशी
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

तीन सरपंच तर दोन ग्रामपंचायती बिनविरोध.
सरपंच पदासाठी 227 तर सदस्य पदासाठी एक हजार 23 नामनिर्देशनपत्र.

अहमदपूरः सरपंचपदासाठी पहिल्यांदाच थेट जनतेतून निवड होणार असतानाच तालुक्यातील तीन सरपंच बिनविरोध निवडून आले असल्याने, तालुक्यासाठी ही हॅटट्रिक ठरली आहे. याबरोबरच दोन ग्रामपंचायती मधील सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत.

तीन सरपंच तर दोन ग्रामपंचायती बिनविरोध.
सरपंच पदासाठी 227 तर सदस्य पदासाठी एक हजार 23 नामनिर्देशनपत्र.

अहमदपूरः सरपंचपदासाठी पहिल्यांदाच थेट जनतेतून निवड होणार असतानाच तालुक्यातील तीन सरपंच बिनविरोध निवडून आले असल्याने, तालुक्यासाठी ही हॅटट्रिक ठरली आहे. याबरोबरच दोन ग्रामपंचायती मधील सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत.

तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी प्रत्येकी एकच तर दोन ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्ये एवढेच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने येथे बिनविरोध निवड झाली आहे. शुक्रवारी (ता. 22) नामनिर्देशनपत्र दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी 227 तर 42 ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी तब्बल एक हजार 23 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.

तालुक्यातील 42 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून, त्यापैकी अंधोरी, मांडणी आणि दगडवाडी या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने येथे सरपंचपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. अंधोरी येथील सरपंचपद हे अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे. येथे  संगीता पिट्टलवाड यांनी एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मांडणी येथील सरपंचपद हे नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी राखीव होते. येथून विठ्ठल गुंडरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.तर नागरिकाचा मागास प्रवर्ग महिलासाठी दगडवाडी येथील सरपंच पदासाठी आरक्षण होते. येथून सुमित्राबाई मुंडे यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने येथे त्यांची  सरपंचपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. मांडणी येथे सात तर दगडवाडी येथे नऊ असे सदस्य संख्ये एवढेच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने या दोन्हीही ग्रामपंचायती मधील सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, या बिनविरोध निवडीबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

अंधोरी येथील सरपंचपद हे बिनविरोध निवडून आले असतानाही मात्र सदस्यांच्या सात जागेसाठी तब्बल 54 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. शिरूर ताजबंद येथील 17 सदस्यासाठी 68 तर सरपंचपदासाठी सहा नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. पाठोपाठ किनगाव येथील 17 सदस्य संख्येसाठी 63 तर सरपंचपदासाठी दहा नामनिर्देशन दाखल झाली आहेत. काळेगाव येथील ग्रामपंचायती मध्ये  नऊ सदस्य निवडून द्यावयाचे असून, त्यासाठी 57 तर सरपंचपदासाठी 13 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. बुधवारी (ता. 27) नामनिर्देशनपत्र परत घेता येणार असले तरी, या ग्रामपंचायतीमध्ये एवढ्यामोठ्या संख्येने नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने येथे चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: latur news Ahmetpur taluka gram panchayat hatatric