ग्रंथालय अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. कुकडे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

लातूर - लातूर येथे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक कुकडे यांची निवड करण्यात आली. 

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच राज्य ग्रंथालय संघाची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत स्वागताध्यक्षपदी डॉ. अशोक कुकडे यांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ऍड. त्र्यंबकदास झंवर यांनी दिली. डॉ. कुकडे हे येथील विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत. त्यांची अनेक पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. अनेक वर्षांपासून ते ग्रंथालय क्षेत्राशी संबंधित आहेत. अधिवेशन ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात होणार आहे.

Web Title: latur news ashok kukade