Latur : बाळांनो मला माफ करा तुमच्यासाठी मी काही करू शकलो नाही" चिठ्ठी लिहून गोद्रीत मराठा आरक्षण व निसर्ग साथ देत नसल्याने तरुणाची आत्महत्या

आई बाबा मला माफ करा. बाळा तुझ्यासाठी मी काही करू शकलो नाही.
latur
latursakal

औसा - "जय जिजाऊ जय शिवराय. मला माफ करा मी चुकीचे करत आहे पण हे झोपेचे सोंग घेतलेले सरकार उठत नाही, निसर्ग साथ देत नाही आणि मराठ्यांना आरक्षण भेटना म्हणून मी आत्महत्या करीत आहे. सरकार अजून किती बळी घेणार आहे.

आई बाबा मला माफ करा. बाळा तुझ्यासाठी मी काही करू शकलो नाही. एक मराठा लाख मराठा" अशी सुसाईड नोट लिहून गोंद्री ता. औसा जी. लातूर येथील एका ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.२९) रोजी सकाळी घडली. मराठ्यांना मिळत नसलेले आरक्षण आणि त्यामुळे समाजात आलेले मागासलेपणा मुळे समाजाची होत असलेली पीछेहाट आणि वरून निसर्गाच्या लहरीपणामुळे तोट्यात आलेली शेती यामुळे उद्विग्न झालेल्या तरुणाने आपला जीव गमावला. शरद वसंत भोसले असे या मृत तरुणाचे नाव आहे.

मराठा आरक्षणाची धग आता गावगावत आणि घराघरात पोहोचली असतांना सरकार मराठा आरक्षणा बाबत करीत असलेला वेळकाढूपणा मराठा समाजाच्या जीवावर उठला आहे. याच नैराश्यातून औसा तालुक्यातील गोंद्री गावातील तरुण शरद भोसले याने आपल्या खिशात सुसाईड नोट लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत शरद भोसले यांचा उदरनिर्वाह शेतीवर होता. घरात पत्नी,

latur
Madaj Sucide Case:मराठा युवकांनी टोकाचं पाऊल उचलू नये, रोहित पवारांचे आवाहन

आई वडील आणि पोटी जन्मलेल्या दोन मुलींना सांभाळताना शेती हाच मुख्य स्त्रोत. ती शेतीही निसर्गाच्या लहरीपणामुळे तोट्यात जात आहे. माझी आणि माझ्या समाजाची ही अवस्था आरक्षण नसल्यानेच झाल्याची भावना त्यांची झाली होती. त्यांच्या सुसाईड नोट मधील मजकूर वाचतांना एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याची खंत तर दुसरीकडे ज्यांची पालन पोषण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे अशा दोन मुली व आई वडील यांचा सांभाळ करण्याची जाणीव दिसते.

latur
Maratha Reservation: मराठा आंदोलक आक्रमक! छत्रपती संभाजीनगरमधून सुटणाऱ्या एसटी बसेस रद्द

बाळा तुमच्यासाठी मी कांही करू शकलो नाही आशा शब्दात मुलींची माफी त्यांनी मागितली आहे. सदरच्या घटनेने गोंद्रीसह जिल्ह्यात मराठा समाजात असंतोष पसरला आहे.   सदरची आत्महत्या मराठा आरक्षण आणि नापिकीमुळे झाल्याची भावना मराठा समाजाची झाली आहे. या घटनेनंतर गोंद्री गावात तणावाचे वातावरण होते. तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाने सर्वांची समजूत काढल्यावर शव विच्छेदन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com