

Latur News
esakal
लातूर: शिक्षण क्षेत्रात सुमारे तीस वर्षांपूर्वी 'लातूर पॅटर्न' सुरू झाला. इथल्या शाळा, महाविद्यालयांतील प्रामाणिक शिक्षकांनी केलेले वेगवेगळे प्रयोग, जोडीला विद्यार्थ्यांची मेहनत, त्यात राखलेले सातत्य यातून हा पॅटर्न राज्यभरच नव्हे, तर देशभर गाजला. गेल्या आठ-दहावर्षांपासून खासगी क्लासेसने इथल्या शैक्षणिक क्षेत्रात शिरकाव केला. पाहता पाहता ही जागा त्यांनी व्यापून टाकली. ती इतकी, की सध्या खासगी क्लासेस चालकांची वार्षिक उलाढाल अंदाजे पाचशे कोटींच्या पुढे आहे.