

SSC 2026: Latur Pattern Back in Spotlight with Outstanding Student Performance
sakal
-सुशांत सांगवे
लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने शुक्रवारी (ता. ८) जाहीर झाला असून लातूर विभागातील तब्बल १०४ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. मागील वर्षी ११३ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के गुण घेतले होते. या निकालामुळे ‘लातूर पटर्न’चा ठसा राज्यात पून्हा एकदा उमटवला आहे.