
लातूर : आष्टामोड परिसरात चंदनाच्या लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडले. पण, टेम्पोत बसलेले चंदनचोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेत ६८ किलो चंदनासह साडेअकरा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.