

Latur News
esakal
लातूर: लातूर जिल्हा पोलिस दलाकडून एकाच वेळी विविध टप्प्यांमध्ये मास रेड, ‘ऑल आउट’ व ‘कोम्बिंग ऑपरेशन’ तसेच ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’बाबत विशेष मोहीम राबविण्यात आली. सलग २१ तास चाललेल्या कारवाईत अवैध दारूप्रकरणी ७४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ‘ऑल आऊट’ व ‘कोम्बिंग ऑपरेशन’द्वारे १९ गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. दारू पिऊन वाहने चालविण्याऱ्या २४ जणांवर कारवाई करण्यात आली.