'पुन्हा पाच वर्ष सत्ता मिळविण्यासाठी कामाला लागा'

शिवशंकर काळे
Monday, 1 February 2021

तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पक्ष वाढविण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश भाजपचे मराठवाडा सहसंघटक संजय कोडगे यांचे दिली आहे

जळकोट (लातूर): 'ज्या जिद्दीने मागील वेळेस नगरपंचायतीवर सत्ता मिळविण्यासाठी संघर्ष केला त्याच जिद्दीने आतापासून कामाला लागावे, असे अवाहन भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा सहसंघटक संजय कोडगे यांनी केले.

शहरातील विरभद्र मंदिरात शहर व तालुक्यातील भाजपचे जिल्हा पदाधिकारी,  जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, सर्व आघाडीचे तालुका अध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांची आगामी काळातील कार्यक्रमासाठी बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

महामारी, आर्थिक मंदी, सामाजिक असंतोष, अपयशी प्रशासन.. खरं संकट कशात आहे?

भाजपने मागील निवडणुकीत सर्व पक्षाला आपली ताकद दाखवून दिली होती. पाच वर्षांत आपण शहरासाठी किती निधी आणला, किती विकास कामे केली, हे मतदारांच्या दारापर्यंत जाऊन सांगा. आपण कामाच्या बळावर निवडणुका जिकतो. दुसरे पक्ष घोषणेच्या जोरावर मतदान मागातत त्यासाठी आपण संतर्क राहून आगामी नगरपंचायत निवडणूक लढवावी असे त्यांनी अवाहन करुन तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पक्ष वाढविण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले.

औरंगाबादचा प्रणव कोरडे ठरला राष्ट्रीय लाॅन टेनिस स्पर्धेचा विजेता

बैठकीला भाजपचे तालुकाध्यक्ष अरविंद नागरगोजे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सोमेश्वर सोप्पा, नगराध्यक्ष किसन धुळशेट्टे, उपनगराध्य रोहणी केद्रे,शहराध्यक्ष दत्ता वंजे, बलाजी केद्रे, विश्वनाथ चाटे, बालाजी मालुसरे, संजय गोन्टे, भाऊराव कांबळे, माधव मठदेवरु, आदिसह भाजपचे तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur political news Work to regain power for five years