Latur News : प्रशंसनीय सुविधासह लातूर रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट

‘अमृत ​​भारत’ योजनेमध्ये समावेश, लोकांकडून मागविल्या सूचना
latur
latursakal

लातूर - भारतीय रेल्वेनेस्थानकांच्या आधुनिकीकरणाच्या उद्देशाने अमृत भारत स्थानक योजना सुरु केली आहे. या योजनेत लातूरच्या स्थानकाचा समावेश झाला आहे. हे स्थानक कशा पद्धतीने विकसित करावे, यासाठी रेल्वेने लोकांकडून सूचना मागविल्या आहेत.

latur
Latur : विध्वंसक कृती रोखली तरच भारताची अखंडता कायम राहिल - नितिन वैद्य

केंद्र शासनाची ही महत्वाकांक्षी योजना असून रेल्वे स्थानके विकसित केली जात आहेत. योजनेचा एक भाग म्हणून फलाटावर सुधारणा, फलाटांच्या आच्छादनाचा विस्तार, स्थानकाच्या दर्शनी भागामध्ये सुधारणा,प्रदक्षिणा क्षेत्रामध्ये सुधारणा, बारा मीटर रुंद ‘एंड-टू-एंड फूट ओव्हर ब्रिज’, प्रकाश व्यवस्था आदी कामे हाती घेतली जाणार आहेत.

प्रवाशांच्या सोयीसाठी पुरेसे फर्निचर, सरकता जिना, लिफ्ट आदी सुविधाही पुरविल्या जाणार आहेत. ही कामे करताना कार्यक्षम ऊर्जा, जलसंधारण आदी उद्देश साधताना उत्कृष्टतेसह टिकाऊपणाच्या घटकांवर लक्ष दिले जाणार आहे. कचरा व्यवस्थापन, इमारत व्यवस्थापनाला महत्त्व दिले जाणार आहे.

latur
Latur Pattern: लातूरच्या अकॅडमीचे ‘नीट’मध्ये यश, ५१ विद्यार्थ्यांना ६०० पेक्षा अधिक गुण

‘अमृत ​​भारत’मध्ये सोलापूर रेल्वे विभागात पंधरा स्थानके विकसित होणार आहेत. त्यात लातूर स्थानकाचा समावेश आहे. रेल्वे स्थानक शहराच्या विकासाचा एक भाग व्हावा, लोकांचाही सहभाग असावा यासाठी रेल्वेने सूचना मागविल्या आहेत.

latur
Latur News : धक्कादायक! तलावात बुडून आईसह दोन मुलांचा मृत्यू

लातूरसह १५ स्थानकाचा विकास

सोलापूर विभागातील या रेल्वे स्थानकांचा विकास होणार ः सोलापूर, दौंड, पंढरपूर, वाडी, अहमदनगर, कुर्डुवाडी, कलबुर्गी (गुलबर्गा), कोपरगाव, शहाबाद, उस्मानाबाद, लातूर, बेलापूर, गंगापूर रोड, दुधनी आणि जेऊर.

सूचनांसाठी आवाहन

लातूर रेल्वेस्थानकाचा विकास करण्यासाठी नागरीकांना तीन ऑगस्टपर्यंत सूचना पाठवता येणार आहेत. drmoffice2011@gmail.com किंवा cprooffice0@gmail.com या मेल आयडीवर किंवा @drmSplapur या ट्विटर अकाउंटला #AmritBharat_Latur असा हॅशटॅग वापरून सूचना पाठवाव्यात, असे आवाहन रेल्वेने ३१ जुलैच्या एका पत्राद्वारे केले आहे.

लातूर स्थानकाच्या आधुनिकीकरणात नागरिकांच्या सूचना मागविण्याचा रेल्वेचा उपक्रम प्रशंसनीय आहे. रेल्वे स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष, दिव्यांगांसाठीच्या रॅम्पमध्ये सुधारणा, लहान मुलांसाठी मनोरंजन कक्ष, स्थानिकांसाठी कलादालन, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्वतंत्र मार्ग, पार्किंग, प्रवेशद्वार, ज्येष्ठांसाठी सुविधा आदी कामांवरही भर देता येईल.

- विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर, लातूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com