लातूर पॅटर्न राज्यात भारी, पण लातुरकरांना का हवे स्वातंत्र विद्यापीठ?

हरि तुगावकर
Thursday, 10 September 2020

विद्यार्थी, पालक, कर्मचारी, प्राध्यापकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नांतून लातूर येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. आज विद्यार्थ्याची संख्या, महाविद्यालयांची संख्या, विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला प्रेरणा मिळावी म्हणून लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी होत आहे.

लातूर : विद्यार्थी, पालक, कर्मचारी, प्राध्यापकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नांतून लातूर येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. आज विद्यार्थ्याची संख्या, महाविद्यालयांची संख्या, विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला प्रेरणा मिळावी म्हणून लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी होत आहे. यात प्रशासनाच्या परवानगी नंतर व्यापक बैठकही घेण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, उपचारासाठी हलवले...

येथे विद्यापीठ स्थापन करावे ही मागणी २०१४ पूर्वी पासून शासकीय व प्रशासकीय स्तरांवर लावून धरत तत्कालीन मुख्यमंत्री, राज्यपाल, शिक्षणमंत्री आदींना प्रत्यक्ष भेटी घेऊन निवेदने, स्वाक्षरी अभियान, धरणे आदींच्या माध्यमातून करण्यात आली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना कृती समितीच्या वतीने ता. ८ मार्च २०२० रोजी शिष्टमंडळाद्वारे भेटून मागणी करण्यात आली होती. या संदर्भात श्री. देशमुख यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना ता. नऊ मार्च रोज पत्राद्वारे आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या मागणीचा विचार करावा अशी विनंतीही केली आहे.

ऑनलाईन सभेची कहाणी : अध्यक्ष आले अन् `जीबी` रद्द झाल्याचे सांगून गेले !

सध्या येथे अस्तित्वात असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ उपकेंद्राच्या शैक्षणिक कामकाजात मर्यादा असल्यामुळे स्थानिक स्तरांवर निर्माण होणारी शैक्षणिक व प्रशासकीय गैरसोय टाळण्यासाठी येथे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्याबाबत सहानुभूती पूर्वक विचार करावा अशी विनंतीही त्यांनी केलेली आहे. मार्चपासून आजतागायत कोरोनाच्या स्थितीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वाढती रुग्णाची संख्या, मृत्यूची संख्या आदींमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वादळी वाऱ्याने ऊस झाला भुईसपाट, पाऊस मात्र कमीच

त्यामुळे आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या पाठपुराव्यास संथ गती आली होती. स्वतंत्र विद्यापीठाच्या अनुषंगाने प्रशासनाने परवानगी दिल्यास विद्यार्थी, पालक, संस्था चालक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षण तज्ज्ञ, शिक्षणेत्तर कर्मचारी, शिक्षणप्रेमी, सामाजिक संघटनांची व्यापक बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य संयोजक अॅड.प्रदीपसिंह गंगणे यांनी दिली. या करीता धनराज जोशी, प्रा. एकनाथ पाटील, बालाजी पिंपळे, अॅड. गोपाळ बुरबुरे, ताहेरभाई सौदागर, प्रा. संगमेश्वर पानगावे, अॅड. अजय कलशेट्टी, प्रा. भीमराव डुनगावे, रणधीर सुरवसे, जावेद मणियार, प्रा. गिरीधर तेलंगे, प्रा. दत्तात्रय खरटमोल, सुनील खडबडे, प्रा. योगेश शर्मा, अॅड अजित चिखलीकर, साईनाथ घोणे, योगेश शिंदे, अनतेश्वर कुदरपाके हे पुढाकार घेत आहेत.
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Residents Demands Separate University Latur News