Latur News: लातूरमध्ये गुपचूप रिक्षा भाडेवाढ; आखाती युद्धाला जोडली महागाई, अचानक वाढविले दर

Rickshaw Fare Increased in Latur After 10 Years: लातूरमध्ये रिक्षा भाडे २०१२ नंतर प्रथमच वाढले; महागाईचे कारण सांगत ऑटो संघटनेने दरवाढ केली; प्रशासनाची मंजुरी अपेक्षित. प्रवाशांच्या अडचणी वाढल्या.
Latur News

Latur News

esakal

Updated on

लातूर: महागाईबरोबरच आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे कारण सांगत शहरातील रिक्षाचालकांनी मनमानी पद्धतीने रिक्षा भाडे वाढवले आहे. या भाडेवाढीची माहिती अद्याप प्रशासनाला नाही. त्यामुळे ऐन अडचणीच्या काळात सर्वसामान्य प्रवाशांची लूट सुरू झाली आहे. एकीकडे सिलिंडरसाठी धावपळ तर दुसरीकडे मनमानी भाववाढ या कात्रीत अनेक सर्वसामान्य अडकले आहेत. यासंदर्भात प्रशासन कठोर पावले उचलून मनमानी दरवाढ रोखणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com