Latur Accident: ट्रकने दोन ज्येष्ठांना उडविले; लातूर शहरातील दुर्घटना, चालक ताब्यात
Truck Accident: लातूरमध्ये भरधाव ट्रकने धडक दिल्याने दोन निवृत्त शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती ठार; शहरात हळहळ व्यक्त. वसंतराव नाईक चौकाजवळ झालेल्या अपघातात डॉ. मारोतीराव ढोबळे आणि माधव तोंडारे यांचा जागीच मृत्यू झाला.
लातूर : भरधाव ट्रकने धडक दिल्याने शिक्षण क्षेत्रातील दोन निवृत्तांचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील वसंतराव नाईक चौक ते कन्हेरी चौकादरम्यान शुक्रवारी (ता. सात) दुपारी घडली.