
Nilanga Crime: मस्साजोग येथील सरपंच हत्या प्रकरण ताजे असतानाच निलंगा तालुक्यातील वाडीशेडोळ येथील सरपंचाला महावितरणचा पोल रोवण्याच्या कारणावरून ग्रामपंचायत कार्यालयातच घुसून मारहाण करण्यात आली आहे.
याबाबतची तक्रार देण्यास शुक्रवारी ता. १७ रोजी पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना ताटकळत ठेवून निलंगा पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे.