
Latur SSC Results 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने मंगळवारी (ता. १३) जाहीर झाला असून लातूर विभागातील तब्बल ११३ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवून राज्याच्या निकालात ‘लातूर पटर्न’चा ठसा उमटवला आहे.