Latur : मेसचालकांच्या विरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur Student agitation against mess canteen managers

Latur : मेसचालकांच्या विरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

लातूर : येथील मेस चालकांनी मेसच्या शुल्कात अचानक वाढ केली. तसेच एक दिवस मेसही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या प्रकाराच्या विरोधात मंगळवारी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर आले. मेसची दरवाढ रद्द करावी अशी मागणी करीत ते दयानंद महाविद्यालयात ते तहसिल कार्यालयावर ते गेले. तेथे त्यांनी मागण्याचे निवेदनही दिले. दरम्यान दिवसभर मेस बंद राहिल्याने या विद्यार्थ्यांना जेवणासाठी दुसरे हॉटेल शोधण्याची वेळ आली.

लातूर हे शैक्षणिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे. हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. जिल्हा तसेच राज्यातील विविध भागातील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थी विविध महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहतात. तर अनेक विद्यार्थी खासगी वसतीगृह, खोल्या करुन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे येथे वसतीगृहासोबतच मेसचा व्यवसाय देखील तेजीत आहेत. येथील खाडगाव रोड भागात तर अशा अनेक मेस आहेत. मेससाठी विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्रति महा अठराशे रुपये मोजावे लागतात.

पण मेस चालकांनी त्यात अचानक सहाशे रुपयांची वाढ करीत दरमहा दोन हजार ४०० रुपये केले आहेत. तसेच मंगळवारी एक दिवस मेस बंदचाही निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांत असंतोष पसरला. दुपारी येथील दयानंद महाविद्यालयाच्या समोर शेकडो विद्यार्थी एकत्र आले. मेस चालकांच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर हे विद्यार्थी तेथून तहसिल कार्यालयावर गेले. तेथे त्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन दिले. मेस दरवाढीच्या विरोधात पहिल्यांदाच येथे अशा पद्धतीचे आंदोलन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या मागण्या

  • मेसचे दर तातडीने कमी करण्यात यावेत

  • पंधरा दिवात वारंवार एकदा मेसमधील अन्नाची तापसणी करण्यात यावी

  • मेसमधून देण्यात येणाऱ्या जेवणात पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा

  • मेलचालकांसाठी नियमावली तयार करावी

  • रुम भाडे मनमानी वाढवण्यात आले असून तेही कमी करण्यात यावे

  • रिडिंगरुमसाठी देखील जास्त शुल्क आकारण्यात येत असून तेही कमी करावे

Web Title: Latur Student Agitation Against Mess Canteen Managers Food Inflation Rate Hike

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..