
शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट व महिला गटांच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) ही योजना हाती घेतला आहे.
लातूर : शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट व महिला गटांच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) ही योजना हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी शेतकरी कंपनी व गटाचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्याचे मोठे आव्हान होते. कृषी व आत्माच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून जिल्ह्यातून ७५४ गटांचे प्रस्ताव सादर केले असून सर्वाधिक प्रस्ताव सादर करून जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे.
या योजनेतून शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट व महिला गट यांना लाभ होणार आहे. गटांना जोडधंद्यासह अन्य सुविधांसाठी लाभ होणार आहे. योजनेच्या लाभासाठी गटांचे ऑनलाइन प्रस्ताव सादर करण्याचे आव्हान होते. सुरवातीला प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ डिसेंबर मुदत होती. ती वाढवून ३१ डिसेंबर करण्यात आली. या मुदतीत कृषी विभाग व आत्माचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रोज रात्री साडेदहापर्यंत ऑनलाइन नोंदणी करून ७५४ प्रस्ताव सादर केले. यामुळे जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासाठी आत्माचे प्रकल्प उपसंचालक आर. एस. पाटील व बी. पी. किरवले यांच्यासह कृषी विभागाच्या जिल्हा व तालुका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
Edited - Ganesh Pitekar