लातूर : फॅन्सी नंबर प्लेट लावली तर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur traffic police action against Illegal number plates

लातूर : फॅन्सी नंबर प्लेट लावली तर कारवाई

लातूर : वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट लावणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे. अशा नंबरमुळे गुन्ह्याचा तपास करण्यातही अडथळे निर्माण होत आहेत. एकीकडे अशा वाहनावर कारवाई करीत असताना आता शहर वाहतूक शाखेने रेडिअम आर्टस दुकानादारांना या संदर्भात नोटीस दिली आहे. यात कारवाई करण्याचा इशारा देण्यता आला आहे. (Traffic Police)

वाहनावर प्रादेशिक परिवहन कार्यलयाकडून विहिती नमुन्यात पुरवण्यात येणाऱ्या नंबर प्लेट्समध्ये बदल करुन आपल्या सोईप्रमाणे रेडिअम आर्टस दुकानदाराकडून फॅन्सी नंबर बनवून ते वाहनावर लावले जात आहेत.

यामुळे वाहन चोरी गुन्हे तपासात अडथळे येत आहेत. अपघाताच्या गुन्ह्यात वाहन क्रमांक अस्पष्ट असेल तर विम्याची रक्कम क्लेम करण्यामध्येही अडचण येवू शकते, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सूचित केलेल्याच नंबर प्लेट्स तयार कराव्यात. दररोज किती वाहनावर नंबर प्लेट लावल्या, कोणत्या स्वरुपात बनवल्या, वाहनाचा आरसी नंबर, इंजिननंबर, चेसिस नंबर, वाहन चालाकचे पूर्ण नाव, पत्ता मोबाईलनंबरसाठी एक स्वतंत्र फाईल तयार करावी. याची माहिती प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस वाहतूक नियंत्रण शाखेस सदार करावी. तसेच एक प्रत Trafficbranchlatu405@gmail.com या ईमेलवर पाठवावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा या शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अवेज काझी यांनी या नोटीसद्वारे दिला आहे.

Web Title: Latur Traffic Police Action Against Illegal Number Plates

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..