

Latur News
esakal
लातूर: शहराची तहान भागविणाऱ्या मांजरा धरणात सध्या ६१ टक्के इतका पाणीसाठा आहे. असे असूनही महापालिकेकडून होणाऱ्या पाण्याच्या अनियमित पुरवठ्यामुळे तर काही भागात नळावाटे येणाऱ्या पिवळसर व गढूळ पाण्यामुळे अनेक लातूरकरांना खासगी टँकरकडे वळावे लागत आहे. त्यामुळेच शहरातील रस्त्यांवर सध्या टँकरची धावाधाव वाढली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याकडे महापालिका प्रशासन गांभिर्याने पाहत नसल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.