

Latur News
esakal
लातूर: समाधानकारक पावसामुळे कलिंगडाच्या उत्पादनात यंदा झालेली भरमसाठ वाढ आणि युद्धामुळे आखाती देशांकडील मागणीत झालेली प्रचंड घट या कारणांमुळे शहरात कलिंगडाची आवक अचानक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शहरात सध्या जागोजागी कमी दरात कलिंगडाची विक्री होताना दिसत आहे. घाऊक बाजारात कलिंगडाला १० ते १५ रुपये किलो दर मिळत आहे.