Latur News: लातूरकरांच्या तोंडी पिवळ्या पाण्याचाच घोट; प्रशासन उत्तर शोधण्यासाठी रस्त्यावर उतरेना, नागरिकांचा नाईलाज

Citizens Forced to Buy Drinking Water: लातूर शहरात पुन्हा एकदा नळाला पिवळसर पाण्याचा पुरवठा झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात ही समस्या उद्भवत असूनही महापालिकेकडून कायमस्वरूपी उपाय होत नाही.
Latur News

Latur News

esakal

Updated on

लातूर: पिवळसर पाणी गेले, असे वाटत असतानाच शहरात रविवारी (ता. १२) अनेक भागांत नळाला पिवळसर पाण्याचा पुरवठा झाला. त्यामुळे पिवळसर पाण्याने लातूरकरांची पाठ अजूनही सोडलेली नाही आणि प्रशासनाने या प्रश्नावर अद्याप कायमस्वरूपी उपाय शोधलेले नाहीत, हे स्पष्ट झाले. भरउन्हाळ्यात येत असलेले पिवळसर पाणी पाहून अनेक लातूरकरांना अक्षरश: आपला हात डोक्यावर मारून घेण्याची वेळ आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com