निलंगा - वडिलांच्या निधनानंतर दिव्यांग पाल्यास कुटुंब निवृत्ती वेतन लागू करण्याचा शासन आदेश असताना केवळ कार्यालयीन दिरंगाईमुळे ७५ टक्के मानसिक विकलांग (दिव्यांग) असलेल्या काशीनाथ कोळी यांना दोन वर्षापासून जिल्हा परिषदेला खेटे मारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून न्याय मिळत नसल्याने आता त्यांनी थेट सीईओच्या दालनातच ठिय्या करण्याचा इशारा दिला आहे.