

Latur ZP President Election
esakal
लातूर: लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड जवळ आली आहे. जिल्हा परिषदेत एकाही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष असला तरी सत्ता स्थापन करण्याइतपत संख्याबळ त्यांच्याकडे नाही.
तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसला महायुती करूनच सत्ता स्थापन करावी लागणार आहे. या करिता दोनही पक्षांनी नवनिर्वाचित सदस्यांना मायानगरीची सफर घडवून आणली आहे. मुंबईत जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडीवर नेत्यांनी खलबते केली आहेत.