

Latur News
esakal
लातूर: जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यानंतर तातडीने एखाद्या अधिकाऱ्याकडे या विभागाचा शिक्षणाधिकारी पदाचा पदभार देणे गरजेचे होते. पण प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.
यामुळे शिक्षण विभागाचे कामावर तर परिणाम होत आहेच, पण जिल्ह्यातील दीड लाख शिक्षकांचे पगारही रखडले आहेत. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यात मार्च अखेरही आहे. प्रशासन शिक्षणाधिकारी पदाचा कधी पदभार देणार याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.