

Latur
esakal
निलंगा: तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विदारक चित्र पाहायला मिळत आहे. त्या भागात जाण्यासाठी शिक्षक नकार देत असल्याने शाळा कशा चालतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. असाच प्रकार कासारबालकुंदा (ता. निलंगा) येथील कन्या शाळेबाबत निर्माण झाला आहे. येथे जवळपास ९५ मुली शिक्षण घेत असल्या तरी पहिली ते सातवी वर्गासाठी केवळ एक शिक्षिका कार्यरत आहे.